Wakad : आयपीएल सामन्यावर बेटींग लावल्याप्रकरणी दहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने टी-20 आयपीएल सामन्यावर  बेंटीग लावणाऱ्या दहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी गुरुवारी (दि.4)  वाकड येथील मिलेनियम मॉलच्या जवळील वेस्टर्न अव्हेन्यू सोसायटीमध्ये केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सुर्यप्रताप कौशल्य सिंग (वय 18), राजेश छोटेलाल कुराबहु (वय 20), रणजित सुरज मुखीया (वय 20), शुभम पुलसी धरू (वय 22),तिलेश अमित कुमार कुरेह (वय 25), जितू नविन हरपाल (वय 28), राहूल कुमार प्रकाश उराव (वय 22), यश प्रसाद शाहू (वय 18), किशन मनोज पोपटानी (वय 22), समया सुखदास महंत (वय 22) यांना अटक केली आहे तर याप्रकरणात ध्याप कार्तिक उर्फ दिनेश आहुजा  व रामू बोमन हे दोघे फरार आहेत.

Pimpri-chinchwad : शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देऊन न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम खासदार बारणे यांनी केले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे वाकड येथून ऑनलाईन पद्धतीने गुरुवारी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या टी-20 सामन्यावर वेगवेगळ्या  बेंटीग अॅपद्वारे बेटींग  (Wakad) करत होते. यावेळी आरोपी कार्तिक व रामू हे बनावट बँक खात्याद्व्रारे बेटींगसाठी पैशांची देवाणघेणाव करत होते.

पोलिसांना याची खबर मिळताच वाकड पोलिसांनी तेथे छापा टाकून  त्याच्याकडून बेटींगसाठी वापरण्यात येणारे एकूण 6 लाख 58 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील  (Wakad) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.