PCMC : आचारसंहिता कालावधीत महापालिका क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या जनसंवाद सभा रद्द

एमपीसी न्यूज – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत (PCMC) महापालिकेमार्फत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या जनसंवाद सभांचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती (PCMC) महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ‍ दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचार संहिता 16 मार्च ते 6 जून, 2024 या कालावधीत घोषित केली आहे. या आचारसंहिता कालावधीत जनसंवाद सभांचे आयोजन केले जाणार नसल्याचे  (PCMC) महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Maval : विजेच्या खांबाला दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालय निहाय कार्यालयीन कामकाजाचा दिवस असलेल्या प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.