Maval : राज्यात मावळ मतदारसंघात सर्वाधिक 2504 मतदान केंद्रे

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात एकूण दोन हजार 504 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. राज्यातील 48 मतदारसंघापैकी सर्वात अधिक मतदान केंद्रे मावळ लोकसभा मतदारसंघात असून, सर्वात कमी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 48 मतदारसंघ आहेत. त्यापैकी सर्वात अधिक मतदान केंद्रे पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात आहेत. मावळ मतदारसंघात एकूण दोन हजार 504 मतदान केंद्रे असणार आहेत. त्यानंतर ठाणे, बारामती, रामटेक आणि बीडचा सर्वाधिक मतदान केंद्रात समावेश होतो. तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 1 हजार 572 मतदान केंद्रे असणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात दोन हजार 372 मतदान केंद्रे असणार आहेत. तर, शिरुर मतदारसंघात दोन हजार 296 मतदान केंद्रे असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.