Maval: लोकसभा मतदारसंघात पावणेतीन लाख मतदार वाढले

घाटाखाली मतदार वाढले ; उमेदवारांना घाटाखाली द्यावा लागणार प्रचारावर जोर

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल दोन लाख 73 हजार मतदार वाढले आहेत. सर्वाधिक घाटाखालील पनवेल विधानसभा मतदारसंघात पाच लाख 14 हजार 902 मतदार आहेत. तर, सर्वांत कमी कर्जत विधानसभात मतदार संघात दोन लाख 75 हजार 480 मतदार आहेत. घाटाखाली मतदारसंघात मतदार वाढल्याने उमेदवारांना घाटाखाली प्रचारावर जोर द्यावा लागणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल दोन लाख 73 हजार मतदार वाढले आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक असून 1 लाख 43 हजार 559 महिला मतदार वाढल्या आहेत. तर, पुरुषांचे 1 लाख 30 हजार 311 मतदान वाढले आहे. यावेळी 11 लाख 66 हजार 272 पुरुष मतदार तर महिला 10 लाख 61 हजार 329 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणूक विभागाने पसिद्ध केलेल्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण 22 लाख 27 हजार 633 मतदार मावळचा नवीन खासदार ठरविणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2014 साली झालेल्या निवडणुकीत 19 लाख 53 हजार 731 मतदार होते. त्यापैकी 11 लाख 73 हजार 949 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 2014 मध्ये मावळमध्ये 60 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 2019 मध्ये 2014 च्या तुलनेत 2 लाख 73 हजार 902 मतदार वाढले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने 2 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यासोबतच अंतिम मतदारयादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण 22 लाख 27 हजार 633 मतदार आहेत. त्यामुळे 22 लाख मतदार मावळचा खासदार ठरविणार आहेत. क्षेत्रफळाने मावळ मतदारसंघ अतिशय मोठा आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत असे एकूण सहा विधानसभा मतदार संघांचा यामध्ये समावेश आहे.

त्यामध्ये सर्वांत मोठा विधानसभा मतदार संघ हा पनवेल आहे. येथे 5 लाख 14 हजार 902 मतदार आहेत. तर, सर्वांत कमी मतदार कर्जत विधानसभात मतदार संघात आहेत. कर्जतमध्ये 2 लाख 75 हजार 480 मतदार आहेत. या निवडणुकीत घाटाखालील मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने उमेदवारांना विजय मिळवण्यासाठी घाटाखालील मतदारांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.