Panvel : ‘अब की बार चार सौ पार’च्या घोषणांमध्ये पनवेलमध्ये भाजपकडून बारणे यांचे स्वागत

एमपीसी न्यूज – ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’ अशा घोषणा देत, फटाक्यांची आतषबाजी करीत पनवेलमधील भाजप कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार बारणे यांनी प्रथमच पनवेल येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदींनी त्यांचे स्वागत केले व तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल सत्कार केला. त्यावेळी बाळासाहेब पाटील, रामदास शेवाळे, नितीन पाटील, परेश ठाकूर, अनिल भगत, अरुण भगत, वाय. के. देशमुख, प्रथमेश सोमण, चंद्रशेखर सोमण, रमेश घोडेकर,  प्रवीण मोहकर आधी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pimpri : ‘बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी  सुरू ठेवा’; काशिनाथ नखाते यांची मागणी

रामशेठ ठाकूर म्हणाले की, यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांपेक्षा यावेळी वातावरण फार चांगले आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार एकत्र आल्यामुळे महायुतीची ‘महाशक्ती’ झाली आहे.खासदार बारणे यांना घाटावर मिळणाऱ्या मताधिक्यात कोकणातील तिन्ही मतदारसंघ मोठी भर घालतील व बारणे तीन ते साडेतीन लाखांच्या विक्रमी आघाडीने जिंकतील, असा विश्वासही रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेले काम सर्वसामान्यांपर्यंत पोहचले आहे. या सर्व   लाभार्थ्यांपर्यंत  पोहोचवण्कायाचे काम भाजप कार्यकर्त्यांनी  अगदी मनापासून केले आहे. त्या कामाच्या जोरावर बारणे यांना पनवेलमधून विक्रमी मताधिक्य मिळेल. चिंचवडपेक्षाही जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा  आम्ही निर्धार केला आहे.

मागील दोन्ही निवडणुकांमध्ये दिलेल्या साथीबद्दल खासदार बारणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. गेल्या दहा वर्षांमध्ये आपण पनवेल, कर्जत व उरण या भागात सातत्याने संपर्कात राहून विकासकामांना गती दिली आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे काही काळ विरोधात बसावे लागले, मात्र आपण कधीही  त्यांच्याशी  कटूता निर्माण होईल असे वागलेलो नाही. पनवेलचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर सदैव पाठीशी आहेत आणि त्यामुळे आपल्याला चांगले मताधिक्य मिळेल याबाबत कोणतीही शंका नाही, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रास्ताविक केले तर  नितीन पाटील यांनी आभार मानले. प्रवीण मोहकर यांनी  ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.