MPC News : ‘बसपा’ लढणार स्वबळावर 

एमपीसी न्यूज : आगामी विधानसभा आणि २०२४ ची लोकसभा निवडणुकीसाठी बसपा , स्वबळावरच या निवडणुका लढवणार असल्याचे (MPC News)  मायावतींनी जाहीर केले आहे. आज(रविवार) त्यांच्या वाढदिवसाच्यादिवशी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना  त्यांनी  घोषणा केली.

Pimpri News : गहुंजे  येथे लायसन्स एजंट ची गळफास घेऊन आत्महत्या

आमचा बहुजन समाज पक्ष हा गरीब, दलित, मागासवर्गीयांचा पक्ष आहे. भाजप सरकारमध्ये शेतकरी, मजुरांवर अन्याय होत आहे.आमच्या पक्षाची  विचारधारा ही अन्य पक्षांपेक्षा वेगळी असल्याने आम्ही  स्वबळावरच निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आणि काही अन्य पक्ष आमच्यासोबत आघाडी करण्यासाठी (MPC News) प्रयत्न करत आहेत, परंतू आम्ही स्वबळावरच लढण्यावर ठाम आहोत.

ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे. बॅलेट पेपरच्यावेळी आमच्या जागांची संख्या आणि सर्व मतांची टक्केवारी ही वाढलेली असायची. पुन्हा बॅलेट पेपरद्वारे मतदान घेणे आवश्यक आहे,असे स्पष्ट(MPC News) मत त्यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.