Pimpri News : गहुंजे  येथे लायसन्स एजंट ची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – हॉटेल व बिअर शॉपचे लायन्सन्स काढून देणाऱ्या एजंटने आर्थिक तणावातून राहत्या घरात गळफास लावून (Pimpri News) आत्महत्या केली. ही घटना गहुंजे येथे घडली.

मनीष भानुदास कामथे (वय 48) असे आत्महत्या केलेल्या एजंटचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने शनिवारी (दि. 14) शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय भुजबळ, स्वप्नील भुजबळ, आकाश नाळे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), हरीश मुसा शेख, भालचंद्र गायकवाड, किरण सोदी, तापकीरकर साहेब (रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात (Pimpri News) आला आहे.

Pimpri Crime News : पतीची पेन्शन मिळवण्याच्या नादात गमावले पावणे दोन लाख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती मनीष कामथे हे हॉटेल व बिअर शॉपचे लायसन्स काढून देण्यासाठी एजंट म्हणून काम करत होते. आरोपींनी त्यांचे लायसन्स काढून देण्यासाठी कामथे यांच्यावर वारंवार त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली. कामथे यांच्याकडून आरोपींनी(Pimpri News) जबरदस्तीने चेक लिहून घेत दबाव व दडपण आणले. या त्रासाला कंटाळून कामथे यांनी 8 जानेवारी रोजी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.