Wardha News : नरेंद्र चपळगावकरांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला दिली भेट

एमपीसी न्यूज- 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा (Wardha News ) धक्का दिला आहे.त्यांनी दिलेल्या या भेटीतून संमेलन वेगळी झाली तरी हरकत नाही, पण दोघांमध्ये आपुलकी असली पाहिजे हा एक चांगला संदेश या निमित्ताने पोहचला आहे.

 

शुक्रवारी वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली होती. या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आहेत.त्यानंतर काल (दि.4) विविध प्रकारच्या विषमतांनी जखडलेल्या बंदीस्त मानवी मेंदूला मुक्त करण्यासाठी प्रतीकात्मक कुलूप उघडून 17व्या  अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन रसिका आगाशे अय्युब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे व मावळते अध्यक्ष गणेक्श विसपुते आदी उपस्थित होते.

Chinchwad by-election : चिंचवड विधानसभा जिंकण्यासाठी सज्ज व्हा – गिरीश महाजन

नरेंद्र चपळगावकर यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत डाॅ.अभय बंग हे देखील होते. या बद्दल बोलताना ते म्हणाले , साहित्यात विभाजन असू शकत नाही. समाज बदलला पाहिजे असं सर्वांना वाटतं. दोन संमेलनात संवाद पाहिजे, येणं जाणं पाहिजे. स्वतः नरेंद्र चपळगावकर (Wardha News ) यांनी आज येथे येऊन आपल्या प्रत्यक्ष कृतीतून हे करुन दाखवलं. हा मोठा पूल त्यांनी दोन्ही साहित्य संमेलनात उभा केला असल्याचं सांगत त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करायला पाहिजे, अशी भावना बंग यांनी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.