Dighi News : पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन दलाकडून सुटका

एमपीसी न्यूज – दिघी येथे पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कावळ्याची भोसरी अग्नीशामनदलाच्या जवानांनी सुटका केली (Dighi News) आहे. ही घटना दिघी येथील सिद्धेश्वर हायस्कूल जवळ शनिवारी (दि.4) घडली.

याप्रकरणी  आदित्य शिळणकर यांनी अग्निशमनदलाला वर्दी दिली . त्यानुसार भोसरी उपकेंद्राचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. तेथे टिव्ही केबलच्या वायरला 40 ते 45 फुट उंचीवर कावळा पतंगांच्या मांज्यात अडकल्याचे दिसले. यावेळी जवानांनी अग्निशमदनदलाच्या गाडीच्या शिडीचा वापर करून कावळ्याला खाली आणले. त्याला खाऊ देत हळूच त्याचा पाय मांज्यामधून साोडवला.

Wardha News : नरेंद्र चपळगावकरांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला दिली भेट

हे बचावकार्य (Dighi News) तानाजी चिंचवडे (लिडिंग फायरमन),  संजय ठाकूर (लिडिंग फायरमन) , सचिन साखरे (वाहन चालक),  संतोष सरवटे (फायरमन),   गणेश काळे (ट्रेनि फायरमन),   मुकुंदराज कोरकाटकर (ट्रेनि फायरमन) यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.