Dighi : सराईत वाहन चोरट्याकडून चार दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – दिघी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला अटक (Dighi )केली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
संतोष जयहिंद गुप्ता (वय 19, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुलीवंदन सणानिमित्त गस्तीवर (Dighi )असलेल्या पोलिसांना एका दुचाकीवरून दोघेजण संशयितपणे जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दिघी आणि चाकण मधून चार दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले.

दोघांकडून दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील तीन आणि चाकण पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.