Shirur Loksabha Election : शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीकडून (Shirur Loksabha Election) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर महायुतीकडून अजित पवार गटातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत नावाची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी आहे. आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात जाहीर प्रवेश देखील झाला. त्यामुळे शिरूर लोकमहाविकास आघाडीकडून (Shirur Loksabha Election) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर महायुतीकडून अजित पवार गटातूनसभेची निवडणूक आता राष्ट्रवादी (शरद पवार) गट विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी होणार आहे.

मागील वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडली. त्यानंतर काहींनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. तर काहींनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. शिरूर लोकसभा मतदारसंघात पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यातच डिसेंबर महिन्यात अजित पवार यांनी कोल्हे यांना या लोकसभा निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच असा चंग बांधला आहे. त्यामुळे अजित पवार यांना तुल्यबळ लढत होण्यासाठी उमेदवार आयात करावा लागला, अशी अनेकांची भावना आहे.

आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी निश्चित केली. शिरूर मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ मानला जात होता. मात्र सन 2019 मध्ये शिवसेनेचा हा गड पाडून राष्टवादी कॉंग्रेस पक्षाकडून अमोल कोल्हे यांनी खासदारकी मिळवली. त्यातही मोदी लाट पीकवर असताना कोल्हे यांनी हा करिष्मा साधला आहे.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी डॉ. आमो कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र आता तेच अजित पवार कोल्हे यांना पाडण्यासाठी सरसावले आहेत. अजित पवार यांचे एवढे विशेष प्रेम आपल्यावर का, असा प्रश्न मलाही पडला असल्याचे खासदार डॉ. कोल्हे बोलून दाखवतात.

सन 2009 पासून अमोल कोल्हे आणि अजित पावर यांची ओळख आहे. असे असले तरी आपण शरद पवार यांच्यामुळे राजकारणात (Shirur Loksabha Election0 आलो असल्याचे कोल्हे सांगतात. त्यामुळे पक्षात फुट पडल्यानंतर आपण शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मी अमोल कोल्हे यांना निवडून आणले, असे अजित पवार सांगतात. सन 2019 पूर्वी अनेक वर्ष राष्ट्रवादीला शिरूर लोकसभेची जागा जिंकता आली नाही. त्यावेळीही अनेक नेते प्रयत्न करीत होते. पण 2019 च्या निवडणुकीत यश आले. त्यासाठी उमेदवार हा देखील फॅक्टर महत्वाचा ठरतो. उमेदवार किती पोटतिडकीने लोकांसमोर जातो, हे महत्वाचे असते. त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या डाव्यांना अमोल कोल्हे बगल देतात.

LokSabha Elections 2024 : निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा – डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत 19 हजार 500 कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प आले आहेत. या प्रकल्पांमुळे पुढील 25 वर्षांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. मेट्रोसाठी देखील या प्रकल्पात जागा आहे. पुणे-नाशिक, पुणे-नगर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर असे मोठे मार्ग तयार होणार आहेत. शिरूरमध्ये राष्ट्रीय वनौषधी केंद्र प्रकल्प येत आहे. बैलगाडा शर्यत, इंद्रायणी मेडीसीटी प्रकल्प, छत्रपती संभाजी महाराज समाधीसाठी विकास, बिबट्यांच्या बाबतीत होणाऱ्या अनेक उपाययोजना याबाबत सकारात्मक प्रयत्न झाले असल्याचे कोल्हे सांगतात.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. यातून प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुधाचे दर कमी झाल्याने केवळ पुणे जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे 960 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे मुद्दे घेऊन कोल्हे प्रचारात उतरणार आहेत. शिरूरमध्ये जे 15 वर्षांत झाले नाही ते मी 5 वर्षांत करून दाखवले, असाही दावा ते करणार आहेत.

धंदा करायचा असेल तर चंदा दे, नाहीतर ईडीचा फंदा घे, असे भाजपचे सूत्र आहे. इलेक्टोरल बॉँडमध्ये इतर सर्व पक्षांच्या वाट्याएवढा एकट्या भाजपचा वाटा आहे. हा मोठा भ्रष्टाचार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार म्हणणारे मोदी आता शेतकरी प्रश्नावर बोलत नाहीत. त्यामुळे पुढील काळात देशाची वाटचाल कशी असेल हे या निवडणुकीत ठरणार असल्याचे कोल्हे सांगतात.

असे असले तरी एक मोठे आव्हान डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोर असणार आहे. त्यात मतदारांची भूमिका महत्वाची राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.