Loksabha Election 2024 : स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य (Loksabha Election 2024)यांच्यावतीने यशदा येथे लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीबाबत स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे (Loksabha Election 2024)स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते.

LokSabha Elections 2024 : निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा – डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

कमी मतदान टक्केवारी असलेल्या मतदारसंघातील मतदानात वाढ करणे, शहरी नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने स्वीपअंतर्गत हाती घेण्यात आलेले उपक्रम यांची माहिती देण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत कार्यशाळेत विचारमंथन करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.