NCP : अजितदादांचा रोहित पवार यांना टोला म्हणाले, ‘काहीजण अधूनमधून’…!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर मी लक्ष (NCP) घातले. कठोर निर्णय घेतले. रस्ते, पुल, पाणी योजना, शैक्षणिक सुविधा देत असताना शहराचे हित डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतले. आता काहीजण अधूनमधून शहरात येत आहेत. वेगळ्या प्रकारचे वातावरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना टोला लगाविला.

अजित पवार म्हणाले, पक्षाच्या स्थापनेपासून शहरातील जनतेने मला, पक्षाला मोठी ताकद, प्रेम दिले. शहरावर माझे विशेष प्रेम आहे. त्यामुळे मला नेहमीच शहराबद्दल आपुलकी, प्रेम जिव्हाळा वाटत असतो. शहराचा विकास व्हावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न चालला असतो. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा नियोजनबद्ध विकास केला. सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक होता. तो आता आपल्याला परत मिळवायचा आहे. त्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

अनेक वेगवेगळ्या तक्रारी असतात. ब-याचदा निविदा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो. रिंग केली जाते. किंमती वाढविल्या (NCP) जातात. कारण नसताना नागरिकांचा कररुपाने आलेले पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च करण्याची अलीकडे बरीच उदाहरणे पहायला मिळतात. शहर नियोजनबद्ध पद्धतीने वसविण्यात आले आहे. झोपडपट्टीमुक्त शहर करायचे आहे. शहराकडे विकासाचा आदर्श म्हणून पाहिले जाते.

Ajit Pawar : डीजेविना उत्सव साजरा करा, अन्यथा….

गेल्या काही दिवसात शहराच्या विकासाची बिघडलेली घडी आपल्याला पुन्हा बसवायची आहे. शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. मागच्या काळात थांबलेल्या विकासाला गती द्यायची आहे. रखडलेली प्रभागातील कामांना गती दिली जाईल.

जिल्हा नियोजन समितीहून निधी दिला जाईल. 15 दिवसातून एकदा शहरातील कामांचा आढावा घेऊन गती देण्याचा प्रयत्न करत आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेली जाणार आहे. टप्प्याने चाकण, सासवड, लोणी काळभोरपर्यंत मेट्रो धावेल. नवीन कार्यकर्ते येण्यासाठी प्रयत्न करावेत. खटके उडत असतील तर थांबवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.