Nigdi :अग्रसेन महाराजांचा पुतळा व उद्यान सुशोभिकरणाच्या मागणीसाठी आगरवाल बांधवांकडून निगडीत निदर्शने

एमपीसी न्यूज – भक्ती शक्ती शेजारी असलेल्या अग्रसेन महाराजांचा पुतळा (Nigdi)आणि उद्यान सुशोभिकरण त्वरित करावे या मागणीसाठी आज आगरवाल बांधवांनी निगडी येथील टिळक पुतळ्यासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली.

माजी उपमहापौर राजू मिसाळ, शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, (Nigdi)माजी नगरसेवक अमित गावडे, सचिन चिखले यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. तर श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सुनील रामेश्वर अगरवाल, पुतळा समितीचे अध्यक्ष सुनील जयकुमार आगरवाल, कार्याध्यक्ष सुभाष बन्सल, सचिव सत्पाल मित्तल, सीए के एल बन्सल, गौरव आगरवाल, अशोक बन्सल, वेदप्रकाश गुप्ता, वेदप्रकाश मित्तल, जोगिंदर मित्तल, आशिष गर्ग, विकास गर्ग, संदीप गुप्ता, विशाल मित्तल, धर्मेंद्र आगरवाल, तरुण मित्तल, अनिल दयाराम अग्रवाल, नरेश जैन, आनंद अग्रवाल, रजनी अग्रवाल, रेणू मित्तल, लता अग्रवाल,सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर,सुधीर आगरवाल आदी उपस्थित होते.

Ind vs Afg : भारताचा अफगाणिस्थानवर 8 गडी राखून विजय; रोहित शर्माचे झंझावती शतक

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आगरवाल म्हणाले की, पालिकेने 2 फेब्रुवारी 2022 च्या बैठकीमध्ये अग्रसेन महाराजांचा पुतळ्याची उभारणी करून उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा ठराव मंजूर झालेला आहे.मात्र पालिकेने अद्याप काम सुरू केले नाही. या कामाला गती यावी यासाठी आम्ही आज पालिकेला निवेदन दिले आहे.सर्व समाजाला भूखंड दिलेत मात्र आम्हाला अद्याप दिले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.