Nigdi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

एमपीसी न्यूज – विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन (Nigdi) समारंभाच्या निमित्ताने शहर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार सोमवारी (दि. 15) घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले.

छावा संघटनेचे शहर उपाध्यक्ष गणेश भांडवलकर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Pune : अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने वाटचाल करत राहणे भारतासाठी अतिशय गरजेचे – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना गणेश भांडवलकर यांनी काळे झेंडे दाखवले. तसेच घोषणाबाजी केली. हा प्रकार निदर्शनास येताच निगडी पोलिसांनी भांडवलकर यांना ताब्यात (Nigdi) घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.