Nigdi : दारू पिण्यास नकार दिल्याने तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी नकार दिल्याने एका तरुणावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री निगडी येथे घडली.

अतुल दिगंबर कसबे (वय 28, रा. राजनगर ओटास्किम, निगडी) असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोन्या धरणे (पूर्ण नाव माहित नाही. रा. ओटास्कीम, निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास कसबे हे जेवण झाल्यानंतर ओटास्किम परिसरात शतपावली करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी सोन्या याने कसबे यांना दारू प्यायला चल असे म्हणत जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. कसबे यांनी त्यास नकार दिला.

त्यावरून संतापलेल्या आरोपी सोन्या याने खिशातून चाकू काढून कसबे यांच्यावर कानामागे, डोक्यात, डाव्या हाताच्या बगलेत चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.