Dighi : लग्नाच्या आमिषाने सज्ञान मुलीने अल्पवयीन मुलाला पळविले

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका सज्ञान तरुणीने अल्पवयीन मुलाला पळवून नेले. ही घटना दिघी येथे घडली.

पायल राजकुमार भस्मे (वय 19, रा. नंदनवन हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणीचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलाच्या 41 वर्षीय वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पायल आणि अल्पवयीन मुलगा एकाच महाविद्यालयात शिकत होते. मुलीने अल्पवयीन मुलाला लग्नाचे अमिष दाखवून बुधवारी (दि. 13 मार्च) फूस लावून पळवून नेले.

दरम्यान, मुलीने ‘आम्ही मोठे होऊन लग्न करूनच परत येणार’ असल्याचे सांगितले आहे. दिघी पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.