Talegaon Dabhade : परांजपे  विद्यामंदिर प्रशालेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – परांजपे विद्या मंदिर या प्रशालेत आनंदी व उत्साही वातावरणात 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सन 1993 -94 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव तसेच परांजपे विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी भूषविले.

Kalewadi : एल.बी. टी. इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेत  स्वातंत्र्यदिन महोत्सव उत्साहात साजरा  

याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच शालेय समितीचे सदस्य आनंद भेगडे,प्रा वसंत पवार,तुषार भेगडे, श्रीकांत दाभाडे,1994/95 एस एस सीचे सर्व माजी विद्यार्थी,प्रतिष्ठित नागरिक,पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच माजी शिक्षक बबनराव शेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर यांनी केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी तुषार भेगडे, श्रीकांत दाभाडे, अंकुश गुंड यांनी मनोगत व्यक्त केले.

शाळा, शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे अतूट नाते आपल्या मनोगतात व्यक्त केले. वसंत पवार,कार्यक्रमाचे मुख्य अतिथी बबनराव शेटे यांनीही आपल्या मनोगतातून अडचणीवर मात करत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक असे अनमोल विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या स्थापनेपासूनची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच सर्व देणगीदार माजी विद्यार्थी यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका ढमढेरे मॅडम यांनी मानले. याप्रसंगी अनेक समूह गीते सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खराडे मॅडम यांनी केले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.