Pavana Dam update : अजूनही धरणातील पाणीसाठा 53 टक्क्यांवरच ; चोवीस तासांत 61 मिलीमीटर पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात (Pavana Dam update) पावसाची संततधार सुरूच आहे.  गेल्या 24 तासात 61मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा फक्त 53  टक्क्यांवर गेला आहे.

Pune : वाहतूक नियमांचे उल्लंघन केला आहात ? त्याबद्द्ल तुमच्यावर खटला दाखल होऊन समंन्स बजावला आहे का? मग हे नक्कीच वाचा…

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 61 मिली मीटर

# 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस –  1171 मिली मीटर

# गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस –  1491 मिली मीटर

#  धरणातील सध्याचा पाणी साठा – 53.57 टक्के

# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 73.06 टक्के

# गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 2.60 टक्के

# 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 35.67  टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.