Pimpri : पावसाची जोरदार बॅटिंग, पवना धरणातून विसर्ग वाढविला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह (Pimpri) मावळातील धरण परिसरात गुरुवारी रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे पवना, आंद्रा, वडिवळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसाचा जोर वाढल्याने दुपारी 2 वाजल्यापासून 5600 क्यूसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल केला जाणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण 100% टक्के क्षमतेने भरलेले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसचा जोर लक्षात घेता विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये सकाळी 6 वाजता 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व येव्यानूसार सकाळी 8 वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून 2100 क्यूसेक्स असे 3500 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला.

पवना धरणाच्या विज निर्मीती ग्रहाद्वारे 1400 क्यूसेक्स व सांडव्यावरून 2100 क्यूसेक्स असा एकुण पवना नदीमध्ये सुरू असणारा 3500 क्युसेक्स विसर्ग वाढवून दुपारी 2 वाजता 5600 क्यूसेक्स करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.

Pimpri : पवना, आंद्रा धरणातून पाण्याचा विसर्ग; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची (Pimpri) शक्यता आहे. पवना नदी काठच्या सर्व नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.