Pimpri : पवना, आंद्रा धरणातून पाण्याचा विसर्ग; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – पवना, आंद्रा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा ( Pimpri) इशारा देण्यात आला आहे.

PCMC : अतिरिक्त आयुक्तपदी IAS अधिकारी देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव फेटाळला

पवना धरण 100% टक्के क्षमतेने भरलेले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसचा जोर लक्षात घेता विज निर्मिती गृहाद्वारे पवना नदीमध्ये सकाळी 6  वाजता 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व येण्यानुसार सकाळी 8 वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून 2100 क्यूसेक्स असे एकूण 3500 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे.

पवना नदी काठच्या सर्व नागरीकांनी  नदीपात्रात उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.

आंद्रा धरणात 100% जलसाठा झालेला आहे. सदर धरण “द्वारविरहित” -Ungated आहे. त्यामुळे पाऊस व धरणातील येवा वाढत गेल्यास त्यानुसार धरण पूर्ण भरून सांडव्यावरून  नदीपात्रात अनियंत्रित विसर्ग चालू होईल. नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले ( Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.