PCMC : आंद्रा धरणातून पुन्हा 80 एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात          

एमपीसी न्यूज – आंद्रा धरणातून पुन्हा 80 एमएलडी पाणी मिळण्यास ( PCMC) सुरुवात झाली आहे. परंतु, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायम आहेत.

आंद्रा धरणातून मिळणा-या पाण्यात मोठी घट झाली होती. चार दिवस 21 एमएलडी पाणी शहरासाठी मिळाले होते. पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये पाणी समस्या भीषण झाली होती. वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, च-होली, मोशी, डुडुळगाव या उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर झाली होती. महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली. त्यानुसार पूर्वीप्रमाणे 80 एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र, तक्रारी कायम आहेत.

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर

शहरवासीयांना मावळातील पवना धरणातून आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवना धरणातून 520, आंद्रातून 80 आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून 15 असे 615 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी ( PCMC) उचलते. त्यानंतरही पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.