SSC HSC Exam Result : दहावी, बारावी परीक्षेच्या 85 टक्के उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण; 5 जून पूर्वी निकाल लागण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा संपल्या आहेत. त्यांनतर ( SSC HSC Exam Result) उत्तर पत्रिका तपासणीची लगभग सुरु झाली आहे. आतापर्यंत 85 टक्के उत्तर पत्रिका तपासून पूर्ण झाल्या असून दहावी आणि बारावीचा निकाल 5 जून पूर्वी लागण्याची शक्यता आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत घेण्यात आली.  राज्यातील 23 हजार 272 माध्यमिक शाळांमधून 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामध्ये 8 लाख 59 हजार 478 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 911 विद्यार्थिनी आहेत. तसेच 56 ट्रान्स जेंडर विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.ही परीक्षा राज्यभर 5 हजार 86 केंद्रांवर घेण्यात आली.

PCMC : आंद्रा धरणातून पुन्हा 80 एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात          

तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत पार पडली. राज्यातील 10 हजार 497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामध्ये 8 लाख 21 हजार 450 विद्यार्थी तर 6 लाख 92 हजार 424 विद्यार्थिनी आहेत. विज्ञान शाखेतून 7 लाख 60 हजार 46, कला शाखेतून 3 लाख 81 हजार 982, वाणिज्य शाखेतून 3 लाख 29 हजार 905, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) शाखेतून 37 हजार 226 आणि टेक्निकल सायन्स शाखेतून 4 हजार 750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यात 3 हजार 320 केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली.

सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाईन माध्यमातून बोर्डाकडे पाठवले आहेत. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागतो. तर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होतो. मात्र, यावर्षी दोन्ही वर्गाचे निकाल 5 जून पूर्वी लागण्याची शक्यता बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात ( SSC HSC Exam Result) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.