Punawale : पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुनावळे येथे एका (Punawale) पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.7) सकाळी पुनावळे येथील अंडरपास ब्रिज जवळ घडला.  

या प्रकरणी मोहम्मद जीशान मोहम्मद मनोवर शेख (वय 20, रा. पिंपरी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून टँकर चालक नानासाहेब चंद्रकांत फुलारी (वय 35, रा. पुनावळे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed : शेतात सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा; 72 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यातील पाण्याचा टँकर एम एच झिरो पाच के 91 37 हा भरधाव वेगाने चालवत होता. यावेळी त्याने समोर दुचाकीवरून जाणारा शाबाज मोहम्मद मेहबूब (वय 20, रा. चिंचवड) याला जोरदार धडक दिली.

यामध्ये शाबाज हा गंभीर जखमी (Punawale) झाला व त्याचा या अपघातात मृत्यू झाला. रावेत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसाचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.