Khed : शेतात सुरू असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा; 72 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील (Khed) गोनवाडी गावाजवळील शेतात पोलिसांनी दारूभट्टीवर छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने गुरुवारी (दि.7)सकाळी केली.
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात जीवन मारुती रजपूत (रा.गोनवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने शेताजवळ असलेल्या ओढ्याच्या कडेला ही हातभट्टी टाकली होती.
Chinchwad : सर्वेक्षणात चिंचवड विधानसभा मतदारसंघ आघाडीवर, 3 लाख 65 हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण
बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या (Khed) हातभट्टीतून पोलिसांनी दोन हजार रुपये किंमतीची दारू व 70 हजार रुपये किंमतीचे कच्चे रसायन असा एकूण 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.