Maratha Reservation : नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज : मागील आठ दिवसापासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे. पण या आंदोलना दरम्यान पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये असंख्य आंदोलनकर्ते जखमी झाले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.

त्याच दरम्यान काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत विचारले असता ते म्हणाले की, जालनामध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. पण पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर दुर्दैवी लाठचार्ज केला.

यामध्ये महिला, वृद्ध नागरिक जखमी झाले. लाठीचार्ज करण्याचा अधिकार कोणी दिला. आम्ही हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारत आहे. पण कोणत्याही प्रकारची उत्तर दिली जात नाही.

Punawale : पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

त्यामुळे या लाठीचार्ज प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली (Maratha Reservation) पाहिजे. तसेच या घटनेची चौकशी होईपर्यंत नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.