Maratha Reservation : मराठा आरक्षण कायद्याची 26 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु

मराठा आरक्षण विधेयकाचे कायद्यात रूपांतर;

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक एकमताने संमत करण्यात आले. ते विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवले असता राज्यपालांनी देखील विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्याने 26 फेब्रुवारी 2024 पासून मराठा आरक्षण राज्यात लागू झाले आहे.

राज्यात आधीपासून सुरु असलेल्या शासकीय नोकरभरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल. 26 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या प्रत्येक शासकीय नोकरभरतीमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले जाणार आहे.जिल्हा परिषदा, शाळा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या पद भरतीत हे आरक्षण मिळणार आहे.

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर

केंद्रात मराठा समाजाला आरक्षण नसणार आहे. तसेच राजकीय आरक्षण देखील नसणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले गेले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल यासाठी महत्वाचा ठरला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर आंदोलन सुरु झाले. दरम्यान जरांगे यांनी आपल्या मागण्या मांडताना अनेकांचा रोष देखील ओढवून घेतला. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल जरांगे पाटील यांच्यावर कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. राज्य सरकारने दोन्ही पातळ्यांवर खेळी केल्याने याचा आगामी निवडणुकांमध्ये काय परिणाम होतो, हे पाहावे (Maratha Reservation) लागेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.