DGP Rashmi Shukla : रश्मी शुक्ला जानेवारी 2026 पर्यंत राहणार ‘पोलीस महासंचालक’

एमपीसी न्यूज – राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (DGP Rashmi Shukla) यांच्यावर राज्य सरकारने कृपादृष्टी दाखवली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला 3 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस महासंचालक पदावर राहणार आहेत.

माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. दरम्यान, आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस प्रमुखांचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. ते चार दिवसांचे पोलीस महासंचालक राहिले. त्यानंतर 4 जानेवारी 2024 रोजी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या.

Maratha Reservation : मराठा आरक्षण कायद्याची 26 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबई येथे कुलाबा आणि पुणे शहरात एक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही कारवाई करण्यात आली होती.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुण्यातील गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी ‘सी समरी रिपोर्ट’ न्यायालयात सादर केला होता. सी समरी रिपोर्ट म्हणजे ‘गैरसमजुतीने दिलेली फिर्याद’. अशा प्रकारचा रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता.

तर मुंबई येथील प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील दोन्ही एफआयआर रद्द केले होते. त्यामध्ये शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली होती. दरम्यान, रश्मी शुक्ला दिली येथे प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या.

त्यानंतर त्यांची पोलीस महासंचालक पदी वर्णी लागली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या. त्यांच्या निवृत्तीला चार महिने शिल्लक असतानाच राज्य सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ दिली असल्याचे म्हटले जात आहे. या मुदतवाढीवर विरोधी पक्षांकडून टीका केली जात (DGP Rashmi Shukla) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.