Maval : मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – भाजपने मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा नारळ( Maval) फोडला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथे भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीस मावळ लोकसभेसह महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकून देशात 400 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार करण्यात आला. भाजप पदाधिकारी जोमाने प्रचाराच्या कामाला लागले असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी बसवण्याचा निर्धार करण्यात आला.

 

DGP Rashmi Shukla : रश्मी शुक्ला जानेवारी 2026 पर्यंत राहणार ‘पोलीस महासंचालक’

 

या बैठकीला माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,चिंचवड मतदार संघाच्या आमदार अश्विनीताई जगताप,भाजपा पिं.चिं.शहर (जिल्हा) शहराध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप,देश सचिव विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील,प्रदेश सदस्य सदाशिव खाडे,माजी आमदार सुरेश लाड,मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे,प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे,पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री मकरंद देशपांडे, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्यासह मावळ लोकसभा मतदार संघातील पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी,संपूर्ण मंडळ कार्यकारिणी,सर्व मोर्चा-आघाडी -प्रकोष्ठ जिल्हा,प्रकोष्ठ मोर्चा कार्यकारिणी,सर्व सुपर वॉरियर्स,सर्व शक्ती केंद्र व बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात विजय मिळविणार याची सर्वांनाच खात्री आहे. त्या अनुषंगाने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज मावळ लोकसभा मतदारसंघ कोअर कमिटीची बैठक रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पार पडली.मावळ लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी मार्गदर्शन केले.
 डाॅ सावंत म्हणाले की, नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून बसविण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.त्यादृष्टीने आपण सर्वांनी जोरदारपणे कामाला लागावे असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाचा फायदा नक्कीच आगामी निवडणुकीत सर्वांना होणार आहे. देशात पुन्हा आपले सरकार यावे यासाठी सर्वांनी कार्यरत राहणे आवश्यक ( Maval)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.