Maharashtra : रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक

एमपीसी न्यूज – पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त , (Maharashtra)आयपीसी अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी या संदर्भात(Maharashtra) बैठक घेतली होती. राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवण्यात आली होती.

Pimpri : तळवडे आगीतील मृतांच्या वारसांना कधी मिळणार मदत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. मुंबईचे महासंचालक रजनीश शेठ हे निवृत्त झाले असून त्यांच्या जागी आता रश्मी शुक्ला या नव्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.