Pimpri : तळवडे आगीतील मृतांच्या वारसांना कधी मिळणार मदत?

एमपीसी न्यूज – तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल कारखान्यात (Pimpri)आग लागून 14 महिला कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेला 21 दिवस हाेऊनही मृतांच्या नातेवाईकांना शासनाने जाहीर केलेली 5 लाखांची मदत अद्याप मिळालेली नाही. जाहीर केलेली मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी नातेवाईक करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे येथील रेडझाेन हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या स्पार्कल फायर कॅण्डल कारखान्यात (दि.8) डिसेंबरला स्फाेट हाेऊन आग लागली. या आगीत 6 महिला कामगारांचा जागीच हाेरपळून मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले हाेते. मात्र, यामधील 8 महिलांचा उपचारा दरम्यान ससून रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत एकूण 14 महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली.

मात्र, 21 दिवस हाेऊनही राज्य सरकारने जाहीर (Pimpri)केलेली मदत अद्याप मृतांच्या वारसांना मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत तरी लवकर मिळावी, अशी मागणी नातेवाईकांमधून केली जात आहे. दरम्यान, तळवडे येथील या आगीच्या घटनेमुळे शहरातील व्यावसायिक आस्थापनांचे महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

Pune : पुण्यातील विद्यार्थ्यांची पिकनिकची बस ताम्हिणी घाटात उलटली, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
तळवडे आग दुर्घटनेत सुरूवातील 9 महिलांचा मृत्यू झाला हाेता. त्यांच्या वारसांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला तत्काळ प्रस्ताव पाठविला. ताे प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला आहे. 5 मृतांच्या काेणत्या नातेवाईकांना मदत द्यायची यावरून गाेंधळ हाेता. त्यांच्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले.

 

त्यानंतर त्यांचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. ताे प्रस्ताव राज्य शासनाकडे जाईल. नातेवाईकांना लवकरात-लवकर मदत मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच पंतप्रधान सहायता निधी मिळविण्यासाठीही पीएम पाेर्टलवर आँनलाइन माहिती भरण्यात आली असे तहसीलदार अर्चना निकम यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.