Pimpri : पोलीस आयुक्तांच्या ट्विटर सदरात सायबर क्राईम व वाहतूक समस्येवर पिंपरी-चिंचवडकरांनी विचारले सर्वाधीक प्रश्न, 350 पेक्षा जास्त नागरिकांनी नोंदवला सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Pimpri)नागरिकांशी ट्विटरद्वारे संवाद साधला. कमी वेळेत नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी शुक्रवारी (दि.29) हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांनी या सदराला उत्तम प्रतिसाद देत पोलीस आयुक्तांना वाढती ट्राफीक समस्या व साबर क्राईम बद्दल विचारणा केली.

यावेळी सायंकाळी चार ते पाच या एक तासाच्या वेळेत 350 पेक्षा (Pimpri)जास्त ट्विट आले. त्यातील 125 पेक्षा जास्त ट्वीट हे सायबर क्राईम व वाहतूक समस्ये बाबत विचारले गेले होते. यात पालकांनी आपल्या पाल्यांचा वाढता मोबाईल वापर व त्याद्वारे होणारी फसवणूक याबाबात चिंता व्यक्त केली.

 

तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मध्यंतरी शाळांमध्ये जाऊन साबर क्राईम बद्दल जी जनजागृती केली त्याबाबतही पोलिसांचे कौतुक केले. तर काही ट्विटर धारकांनी ऑनलाईन टास्क बाबत प्रश्न विचारून होणाऱ्या फसवणूकी बाबत चिंता व्यक्त केली.

Pune : पुण्यातील विद्यार्थ्यांची पिकनिकची बस ताम्हिणी घाटात उलटली, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

यावेळी पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन आमिषांना बळी न पडता, मुलांशी त्याबाबत संवाद साधण्याचे आवाहन केले. तसेच साबर क्राईम बाबात जागृत होत सायबर स्मार्ट होण्याचा सल्ला पोलिसांनी दिला यावेळी आयुक्तांनी हटके उत्तर देत नाम मे क्या रखा है असा हटके रिप्लाय दिला आहे.

याबरोबर क्राईम बरोबरच पिंपरी-चिंचवडकरांनी शहरातील ट्राफिक बद्द्ल ही प्रश्न विचारले ज्यामध्ये वाकड व हिंजवडी परिसरातील वाहतूक प्रश्नाबाबत मुखत्वेकरून विचारले आहे. यात वाकड व हिंजवडी परिसरारत वाहतूक पोलिसांना तक्रार करून देखील वातूक नियमन होत नसल्याची तक्रार देखील नागरिकांनी केली आहे. तर एका युजर्सने विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे. यावर पोलिसा आयुक्तांनी वाहतूकी बाबात कारवाई कडक करू तसेच नागरिकांनी ही वाहतूकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य कऱण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी काही प्रश्न अनुत्तरीत राहिले होत ते प्रश्न पुढील सत्रात घतले जाली असेही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले आहे. मात्र पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या या सदराला नागरिकांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.