Pune :पुणे ते हरिहरेश्वर ट्रिपसाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

एमपीसी न्यूज -पुण्यातील ए.सी.एच कंपनीची (Pune)  पुणे ते हरिहरेश्वर ट्रिपसाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात बसमधील अनेक जखमी जण झाल्याची माहिती समोर येत आहे.

तर दोघांचा मृत्यू झाल्याचेही समजते. माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाटाजवळ शनिवारी सकाळी हा अपघात झाला आहे .

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास(Pune) पुणे शहरातून माणगावच्या दिशेने निघालेली बस रस्त्यावरून खाली उतरली आणि जागेवरच पलटी झाली. बस मध्ये पुणे शहरातील ए.सी.एच कंपनीचे अनेक जण होते. हे सर्व लोक ट्रीपसाठी हरिहरेश्वरला निघाले होते.

Lonavala : लोणावळा पोलिसांचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मानगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून ,जखमींना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.