Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या भरतीची जाहिरात, 5 ते 25जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 27 एप्रिल (Maharashtra)रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्यभरातील 37 जिल्हातील केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 5 ते 25 जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

एमपीएससीने याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या माध्यमातून विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Pune : शिवरायनगर येथे नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन

त्या अंतर्गत सामान्य प्रशासन विभागातील राज्यसेवा (Maharashtra)संवर्गातील 205, मृद आणि जलसंधारण विभागातील महाराष्ट्र स्थापत्य सेवा ,अभियांत्रिकी सेवा संवर्गातील 26, महसूल आणि वन विभागातील महाराष्ट्र वनसेवा संवर्गातील43पदांचा समावेश करण्यात आला आहे.

वरील पदांसाठी अर्ज करून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी 25 जानेवारी ही अंतिम मुदत असुन, 29 जानेवारीपर्यंत चलनाद्वारे शुल्क भरता येणार आहे.

पूर्व परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 होणार आहे .23नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र स्थापत्य सेवा अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024, आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 28 ते 31 डिसेंबर यावेळेत होणार असल्याचेही एमपीएससी कडून स्पष्ट करण्यात आले आहे .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.