Pimpri : गौतमी पाटीलच्या अश्लिल नृत्यावर बंदी घालावी, प्रदिप नाईक यांची मागणी

एमपीसी न्यूज – गौतमी पाटील च्या अश्लिल नृत्यावर बंदी (Pimpri)घालावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकारीणी सदस्य प्रदिप नाईक व किरण गवळी यांनी निवेदनाद्वारे तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे केली आहे.हे निवेदन नाईक यांनी भोसरी पोलिसांकडे सादर केले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गौतमी पाटील हिच्या महाराष्ट्रातील नृत्य बंदीसाठी या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरता देखील तिच्या कार्यक्रमाच्या परवानगीचे अर्ज आल्यास ते नाकारण्यात यावेत.

Lonavala : लोणावळा पोलिसांचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

कारण लावणी हि महाराष्ट्राची लोककला आहे. या कलेत कधीही (Pimpri)अश्लिलता दिसली नाही. मात्र गौतमी पाटील ने तमाशाच्या नावाखाली कलेला ही लाजवले आहे. नृत्यातून केले जाणारे अश्लिल हावभाव तरुण पिढीला वेगळ्याच वळणावर नेत आहेत.

तमाशा लावणी याची परंपरा व गौतमी पाटील यांचे नृत्य यांच्यात खूप तफावत आहे. त्यांचे नृत्य कमी अश्लिलता जास्त पहायला मिळते. या अशा नृत्यांमुळे लावणीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत आहे.

गौतमी पाटील हि देखील महाराष्ट्राची कन्या आहे. तिला असे नृत्य शोभत नाही. तिच्या कलेला नाही तर तिच्या अश्लिल हावभावांना सारे विरोध करत आहेत. याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडत आहे. पुरुषांच्या नजरा वाईट म्हणून पुरुषांना सतत सुनावले जाते मात्र महिलांना असे नृत्य करायला मुभा आहे का? समाज व कादे देखील पुरुषांच्या विरोधात आहे अशा परिस्थीत गौतमी सारख्या मुलींना कोण अडवणार. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोककलेची बदनामी थांबवावी व गौतमी पाटीलच्या अश्लिल नृत्यावर त्वरीत राज्यात बंदी घालावी, अशी मागणी प्रदिप नाईक व किरण गवळी यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.