Marunji : सिगारेटचे पैसे मागितले म्हणून अल्पवयीन मुलांकडून टपरी चालकास कोयता व रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – सिगारेट खरेदी केल्यानंतर सिगारेटचे पैसे (Marunji )मागितले म्हणून अलेपवयीन मुलगा व त्याच्या मित्रांनी रॉडने व कोयत्याने टपरी चालकास मारहाण केली आहे. हा सारा प्रकार गुरुवारी (दि.28) मारुंजी येथे घडला.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात सुनिल मुलुगराज गिरी (वय 35 रा.मारुंजी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून हिंजवडी पोलिसांनी 17 र्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या दोन मित्रांवरही गुन्हा दाखल केला आहे.

Wakad : अंडाभुर्जीच्या गाडीजवळ लघुशंका केली म्हणून तरुणावर कोयत्याने जिवघेणा हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या (Marunji )टपरीमध्ये बसले असतानाअल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रासह आला व त्याने सिगारेट मागितली. फिर्यादी यांनी दिली व त्यानंतर पैसे मागितले. यावेळी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. ही भांडणे सोडविण्यासाठी आले असता रॉडने व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.