Kuruli : तीन लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक

एमपीसी न्यूज – तीन लाख रुपयांच्या गुटख्यासह कुरळी येथे (Kuruli)एकाला अटक केली आहे. हि कारवाई शुक्रवारी (दि.29) अंमली पदार्श विरोधी पथकाने केली आहे.

धनंजय छबन काकडे (वय 33 रा.हडपसर) याला अटक केली असून त्याचा साथीदार अमित चव्हाण (रा. चिंबळी) याच्यावर गुन्हा दाखल केली आहे.याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई अशोक गारगोटे यांनी फिर्याद दिली आहे.

Pimpri : तळवडे आगीतील मृतांच्या वारसांना कधी मिळणार मदत?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कोणत्याही(Kuruli) परवानगी शिवाय त्याच्या टपरीमध्ये व पत्र्याच्या शेडमध्ये गुटखा, सुगंधी सुपारी, पान मसाला असा एकूण 3 लाख 9 हजार 299 रुपयांचा ऐवज साठवून ठेवला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत आरोपीला अटक केली असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.