Manoj Jarange : राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये! मनोज जरांगे यांना केलेले वक्तव्य भोवणार का?

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणासाठी (Manoj Jarange) मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अपशब्द वापरले. यावेळी मात्र राज्य सरकारने आपला संयम सोडून थेट जरांगे यांच्या वक्तव्याच्या चौकशीचे आदेश दिले. आज विधानसभेत महायुतीच्या नेत्यांनी जरांगे यांच्या वर्तनाचा निषेध करत त्यांचा बोलवता धनी कोण? यासाठी चौकशीची मागणी केली. ही मागणी पाहता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या हिंसक वक्तव्याशी निगडीत घडामोडींची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश गृहखात्याला दिले होते. त्या नंतर मनोज जरांगे यांनी वापरलेल्या शब्दाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र सरकारने आता या बाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

जरांगे यांच्या वक्तव्याच्या चौकशीच्या आदेशासोबतच जिल्ह्यात आणि तालुक्यात मराठा आंदोलनावेळी झालेल्या नुकसानीचाही अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक आणि पोलिस आयुक्त कार्यालय हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यांची, मालमत्तेच्या नुकसानीची व कारवाईची माहिती संकलन केली जात आहे.

Pune : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

तसेच आतापर्यंत 102 आंदोलकांवर झालेल्या गुन्ह्यांची देखील (Manoj Jarange) तपासणी केली जात आहे. इतकेच नव्हे तर काल मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेऊन छत्रपती संभाजी नगर येथे उपचारासाठी गेले होते. मात्र आज पोलिसांच्या माध्यमातून अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळाचा मंडप काढण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे हे पुन्हा अंतरवालीला रवाना झाले आहेत.

मनोज जरांगे यांची दिलगिरी –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल मनोज जरांगे यांनी अपशब्द वापरले. यावर आता त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. 17 दिवस पोटात अन्न नसल्याने मी रागाच्या भरात बोलून गेलो असे त्यांनी म्हंटले. मी आई-बहीणींचा आदर करतो. मी असे काही बोललो असेन दिलगीर व्यक्त करतो असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.