Pimple Saudagar : टास्क व क्रिप्टो करंसीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : स्टार स्पोर्ट क्रिकेट करन्सीचा बहाना (Pimple Saudagar) करत एका 52 वर्षीय नागरिकाची 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने 26 ते 27 ऑगस्ट 2023 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली आहे.

याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील 52 वर्षीय नागरिकाने सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.7) फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी याप्रकरणी एका अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ग्लोबल इंडिया कंपनीच्या वतीने ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. त्या मार्फत काही टास्क पूर्ण करण्यासही सांगितले.  टास्कचे फिर्यादी यांना पैसे मिळाले.

Maratha Reservation : नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा – पृथ्वीराज चव्हाण

त्यानंतर आरोपीने क्रिप्टो करन्सीबाबत माहिती देऊन फिर्यादी यांना पैसे गुंतवण्यास सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर फिर्यादी यांनी 33 लाख रुपये गुंतवले. ज्याचा त्यांना 60 लाख रुपये परतावा मिळणार होता.

मात्र, ही रक्कम मागितल्यास त्यांना टॅक्स (Pimple Saudagar) ड्युटी भरली नाही, तर परतावा मिळणार नाही असे सांगण्यात आले. यावरून फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या संपूर्ण प्रकरणात फिर्यादी यांची 33 लाख 2 हजार 440 रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यानुसार सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.