Pavana Dam update :  पावसाचा जोर ओसरला; धरणाचा साठा 51 टक्यांवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला (Pavana Dam update) आहे.  गेल्या 24 तासात केवळ 40 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 51 टक्यांवर गेला आहे.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या कॉपीराईट नोंदणीची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया मध्ये नोंद

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 40 मिली मीटर

# 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस –  1010 मिली मीटर

# गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस –  1472 मिली मीटर

#  धरणातील सध्याचा पाणी साठा – 51.43 टक्के

# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 71.21 टक्के

# गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 3.70 टक्के

# 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 33.44  टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.