PCMC : शाळेतील समस्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेत विविध समस्या निर्माण झाल्यास (PCMC) मुख्याध्यापक, शिक्षकांना अडचणी येतात. समस्या एकाच ठिकाणी सांगून त्या समस्यांचे निराकारण व्हावे, या उद्देशाने महापालिकेने सारथीसारखी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे.

Wakad : अतिरीक्त शुल्क आकाराल्याबद्द्ल हटकले म्हणून ग्राहकाला पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांकडून मारहाण  

जेणेकरून शिक्षक या हेल्पलाइनवर समस्या सांगून पालिकेच्या संबंधित विभागामार्फत त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली. नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठांना एखाद्या ठिकाणी बसून पुस्तके वाचताय यावीत, यासाठी शहरात एकही असे हक्काची लायब्ररी नाही.

तसेच शहरातील नागरिकांची वाचन संस्कृती वाढावी, या हेतून महापालिकेच्या अत्याधुनिक सुविधा, पुस्तकांनी सज्ज अशी लायब्ररी उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या जागेची (PCMC) चाचपणी सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.