PCMC : प्रश्नांच्या तत्काळ निवारणाचा ‘करसंवाद’

मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घेण्याचे करसंकलन विभागाकडून आवाहन

एमपीसी न्यूज –  करदात्यांच्या शंकाचे निरसनासाठी करसंकलन विभागाने करसंवाद उपक्रम सुरू (  PCMC ) केला. नागरिकांच्या मालमत्ताकराबाबतच्या शंका, प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी आज (शनिवारी) पार पडलेल्या करसंवादास नागरिकांनी ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.

करसंकलन विभागाने करदात्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू केलेल्या ‘तू करदाता, तू करविता’ अभियानाबाबतचा उद्देश व स्वरूप, मालमत्ताकराच्या ऑनलाइन सवलती, मालमत्ता हस्तांतरण, विभागाचे नवे धोरण आदींबाबतच्या शंकांचे निरसन व माहिती साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्या मार्फत देण्यात आली. यावेळी विभागाचे अधिकारी, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये थेटसंवाद असा उद्देश असलेल्या करसंवादामध्ये शनिवारी विभागाने नागरिकांना विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाकडून तत्काळ माहिती पुरविण्यात आली. विभागाच्या तत्काळ मिळालेल्या माहितीमुळे नागरिकांनी मनमोकळ्या पद्धतीने विभागाचे पुढील धोरण आदी बाबतचे प्रश्न विचारण्यात आले. करसंवादामध्ये 50 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला.

Chinchwad : ट्रॅव्हल्स मधून प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधून साडे तीन लाखांचा ऐवज चोरीला

करसंकलन विभागाकडून घेण्यात आलेल्या करसंवादामध्ये विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाने दखल घेऊन केलेल्या कारवाईबाबत शनिवारी पार पडलेल्या करसंवादामध्ये नागरिकांनी विभागाचे अभिनंदन केले. मालमत्ताकरावरील ऑनलाइन चार टक्के असणारी सवलत, मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेमध्ये विभागाने आणलेली सुलभता, विलंब शुल्काबाबत शंकाचे निरसन, ‘माझी मिळकत माझी आकारणी’मुळे मालमत्ता आकारणीमध्ये झालेली स्पष्टता आदींबाबतच्या प्रश्नांचे निरसन करसंवादाच्या माध्यमातून करण्यात आले. त्याबरोबरच विभागाने घेतलेले निर्णय, शासन निर्णय, परिपत्रके आदी नागरिकांसाठी (  PCMC ) महत्त्वाच्या बाबी तत्काळ ऑनलाइन पद्धतीने प्रश्नाला उत्तर देताना त्याबाबतची माहिती नागरिकांना पुरविण्यात आली.

करसंकलन विभागाने चालू वर्षी पहिल्या चार महिन्यांमध्ये 500 कोटींचा टप्पा ओलांडून करसंकलनाचा नवा विक्रम केला. सध्या सुरू असणाऱ्या योजना व सवलतींचा नागरिकांनी, सोसायट्या, संस्था अशा करदात्यांनी लाभ घेऊन आपला मालमत्ताकर भरण्याचे आवाहनही साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडून करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करते. महापालिका नागरिकांना सेवा देताना करसंकलन विभाग विविध कारणांसाठी कराची आकारणी करून नागरिकांकडून करसंकलन करतो. जागरूक करदात्यांनी भरलेल्या कराचा पैसा समाजोपयोगी कामामध्ये वापरला जातो.

तसेच गरजू घटकांना त्याचा फायदा होत असल्याने पालिका व करसंकलन विभाग नेहमीच करदात्यांबाबत कृतज्ञता बाळगून आहे. त्यामुळे शहराच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या करदात्याबाबत आम्ही ‘तू करदाता, तू करविता’ या अभियानातून कृतज्ञता व्यक्त करीत असल्याचे  नीलेश देशमुख यांनी (  PCMC ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.