Khed : कोयाळी गावात दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कोयाळी गावात सुरू असलेल्या दारू भट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे ( Khed) शाखेच्या पोलिसांनी छापा मारला. यामध्ये दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 25) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

PCMC : प्रश्नांच्या तत्काळ निवारणाचा ‘करसंवाद’

पोलीस अंमलदार समीर काळे यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कोयाळी गावात भिवरे वस्ती येथे वड्याच्या कडेला एका महिलेने दारू भट्टी लावली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली.

यामध्ये पोलिसांनी एक लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. आळंदी पोलीस तपास ( Khed) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.