Mahalunge : ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने सोळा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची 16 लाख 40 हजारांची फसवणूक ( Mahalunge) करण्यात आली. ही घटना 22 आणि 23 ऑगस्ट रोजी मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथे घडली.

अनुप केशवराव मोहोळ (वय 38, रा. महाळुंगे, ता. मुळशी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed : कोयाळी गावात दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना युट्युब वरील व्हिडिओ पाहिल्यास तसेच त्याच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यास प्रत्येकी पन्नास रुपये मिळतील असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी काही व्हिडिओ पाहत चॅनलला सबस्क्राईब केले.

त्याच्या बदल्यात आरोपींनी फिर्यादी यांच्या खात्यात पन्नास रुपये पाठवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन ( Mahalunge) करून त्यांना आणखी टास्क देत त्यांच्याकडून 16 लाख 40 हजार रुपये घेते त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.