Pimpri : वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाने साजरा झाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा

एमपीसी न्यूज – ‘मेरी माटी ,मेरा देश’ व  ‘मिट्टी को नमन, विरों को वंदन’ या उपक्रमा अंतर्गत भूगोल फाउंडेशन व एमआयडीसी ( Pimpri ) भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माझी माती, माझा देश व पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपली वसुंधरा हिरवीगार दिसण्यासाठी विविध प्रकारची देशी वृक्षांचे  वृक्षारोपण सेक्टर-4 संतनगर मधील हनुमान मंदिर परिसरात करण्यात आले.

Mahalunge : ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने सोळा लाखांची फसवणूक

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राजेंद्र निकाळजे व भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष  विठ्ठल नाना वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टाफ आणि संतनगर मित्र मंडळाचे, भूगोल फाउंडेशनचे सदस्य आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिवाजी पांचाळ यांच्या हस्ते वृक्षांची पूजा करून त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करुन करत असलेल्या कामाचे कौतुक केले. नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष वसंतराव फावडे, सुनील दामोधर नागरगोजे, संदीप महादेव मांडवी, जीवन रमेश बिराजदार, निलेश त्रेंबक अरगडे,  भानुदास पोटे, पोलीस शिपाई – तानाजी सिताराम सोनवणे, संजय बाबासाहेब थेटे, सुनील काशिनाथ कोळी, विष्णू जालिंदर चोपडे, इंद्रजीत सुभाष कांबळे तसेच महिला पोलीस अंमलदार – अर्चना सचिन चौधरी, पुष्पा देवराम आहेर, लता राजेश पारधी, अर्चना जाधव, मीनाक्षी राळॆ आणि कर्नल तानाजी अरबुज, शशिकांत वाडते, राजेंद्र ठाकूर, एकनाथ फटांगडे, अजिंक्य पोटे, सिताराम वाळुंज, पोपटराव हिंगे, श्रीकृष्ण म्हेत्रे, महाजन साहेब, अंबादास कुमावत, रामलाल अहिर , पठारे काका, लोकेश निकम, गणेश , सागर, हेमंत , शोभाताई फटांगडे, ज्योतीताई दरंदले, पडवळ , निकमताई व इतर नागरिक सहभागी झाले ( Pimpri ) होते.

यावेळी कर्नल तानाजी अरबुज यांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या पर्यावरणाच्या कामाची माहिती दिली व सर्वांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत वाडते, शोभाताई फटांगडे आणि पोलीस हवालदार संतोष फावडे यांनी विशेष परिश्रम ( Pimpri ) घेतले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.