Maval : बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष, पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष ( Maval ) आणि विद्यमान संचालक सहकारभूषण बबनराव भेगडे यांचा 67 वा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त  कोणतेही कार्यक्रम न घेता वृक्ष संवर्धनासाठी हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांसोबत त्यांनी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
भेगडे यांच्या निवासस्थानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय,सामाजिक,सहकार, वैद्यकीय,क्रीडा,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.यामध्ये मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, लोकसभेचे इच्छुक उमेदवार संजोग वाघेरे,बापूसाहेब भेगडे,गणेश खांडगे, गणेश भेगडे,बबनराव भोंगाडे,सुरेश धोत्रे,रवींद्र भेगडे,गणेश काकडे,संतोष भेगडे,संतोष मुऱ्हे,कैलास हुलावळे, अंकुश आंबेकर,अतुल राऊत,  दत्तात्रय पडवळ,संजय खांडेभराड, गणेशआप्पा ढोरे,विकास कंद,

शिवाजी टिळेकर,कृष्णा दाभोळे, प्रवीण झेंडे,अभिजित काळोखे, शिवाजी असवले,शरद भोंगाडे, किशोर भेगडे,सुनील दाभाडे,नंदकुमार कोतूळकर,सुनील भोंगाडे,सुभाष जाधव,राहुल पारगे,सुदर्शन खांडगे, रामभाऊ गवारे,विक्रम कदम,आशिष खांडगे,निलेश राक्षे,नामदेव शेलार, शरद हुलावळे ,मिकी कोचर, विशाल वाकडकर,विठ्ठलराव शिंदे, शैलजा काळोखे,दिपाली गराडे तसेच  तळेगाव व चाकण एमआयडीसी  मधील कंपन्यांचे प्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील अधिकारी,मावळ तालुक्यातील पत्रकार बंधू व श्री  डोळसनाथ नागरी सह पतसंस्थेचे सर्व संचालक,मावळ तालुक्यातील विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
सहकारभूषण बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता वृक्ष संवर्धनासाठी हरणेश्वर टेकडी तळेगाव स्टेशन येथे वृक्षारोपण केले.या ठिकाणी विविध वृक्षांचे वृक्षारोपण तालुक्यातील त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांसोबत व उपस्थित कार्यकर्त्यांसोबत केले.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन पुणे पीपल्स को ऑप बँकेचे तज्ञ संचालक कौस्तुभ भेगडे,श्री डोळसनाथ महाराज पतसंस्थेचे संचालक शंकर छबुराव भेगडे,नगरसेवक संतोष भेगडे मित्र परिवार आदींनी ( Maval ) केले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.