Pimpri : मुलीला भेटण्यासाठी आलेल्या पत्नीला बेदम मारहाण ; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मुलीला भेटण्यासाठी आलेल्या पत्नीला पतीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पत्नीने पोलिसात ( Pimpri) तक्रार केली. ही घटना गुरुवारी (दि. 24) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विठ्ठल नगर पिंपरी येथे घडली.

अशोक भगवान धायगुडे (वय 37, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अशोक यांच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाने साजरा झाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या आईसोबत आरोपी अशोक धायगुडे यांच्या घरी आल्या होत्या. मात्र घर बंद असल्याने त्या परत जात असताना पती अशोक याची भेट झाली. त्याने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला आता पोर आठवली का. तू पोरांना भेटायला का आलीस’ असे म्हणत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत ( Pimpri) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.