Pune Crime News : गर्भवती पत्नीला मारहाण; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -पती-पत्नीमध्ये घरातील छोट्या-मोठ्या कारणावरून वाद झाल्यानंतर (Pune Crime News)  पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर पत्नी गर्भवती असल्याचे माहित असतानाही त्याने पत्नीच्या पोटात लाथा घातल्या. यामुळे पत्नीचा गर्भपात झाला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे गावात 28 मार्च रोजी ही घटना घडली. 

याप्रकरणी सलोनी सुनील धारक यांनी तक्रार दिली असून पती सुनील विनायक धारक याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुण्यात कालच्या वादळी पावसात 31 झाड पडीच्या घटना

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी पती-पत्नी आहेत. घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी या गर्भवती आहे हे माहीत असतानाही त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी या मार चुकवत असतानाही आरोपीने पोटावर जोरात लाथ मारून त्यांना दुखापत केली. या मारहाणीत फिर्यादीचा  गर्भपात झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास लोणी काळभोर पोलीस (Pune Crime News) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.