Pune : पुण्यात कालच्या वादळी पावसात 31 झाड पडीच्या घटना

एमपीसी न्यूज – पुण्यात काल (रविवारी) दुपारी तीनच्या सुमारास वादळी (Pune) वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसात पुणे शहर परिसरात 31 झाड पडीच्या घटना घडल्या असून अग्निशमनदलाने घटनास्थळी जाऊन पडलेली झाडे दूर केली आहेत. तसेच भवानी पेठेत मोठे होर्डिंग पडण्याच्या स्थितीत असताना दलाच्या जवानांनी होर्डिंग काढत पुढील धोका दूर केला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी नाही.

MPC News Podcast 10 April 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

शहराच्या बाहेर उपनगरांमध्ये आणि लगतच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुळशी गिरिवन परिसरात 8.5 मिलिमीटर, वडगावशेरी भागात सात मिलिमीटर, कोरेगाव पार्क परिसरात तीन तर मगरपट्टा आणि आंबेगाव भागात अडीच मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे  पुणे वेधशाळेने कळवले आहे.

आजही पावसाची शक्यता

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही (सोमवारी) सायंकाळी पुणे व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण व गोवा किनारपट्टीवर उष्णेतेत झालेल्या वाढीमुळे राज्यात  वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. पुढील 15 तारखेपर्यंत पाऊस नसला तरी परिसरात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान (Pune) खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन वेधशाळेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.