Alandi : जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील 4 विद्यार्थी प्रविष्ट

एमपीसी न्यूज – काल दि.25 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य (Alandi) यांच्या वतीने ग्लॅडीओलस इंग्लिश मेडीयम स्कूल, चाकण येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय बुद्धिबळ (चेस) स्पर्धेत  14 वर्ष वयोगट मुलींमध्ये श्रावणी वाघमारे,  17 वर्ष वयोगट मुलांमध्ये सुजित जोरी तर 19 वर्ष वयोगट मुलींमध्ये नेहा वाघ व विद्या गांगुर्डे या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली.

Pimpri : मुलीला भेटण्यासाठी आलेल्या पत्नीला बेदम मारहाण ; पती विरोधात गुन्हा दाखल

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या अंतर्गत पूजनीय दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. यावेळी गौरी देशपांडे, शुभांगी घेवडे, भाग्यश्री महाराष्टे, पूजा रायरीकर व हनुमंत घाडगे, विद्यार्थी उपस्थित (Alandi)  होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.